दोन तरुणींनी वाचवले मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुलीचे प्राण

आपला देश काही बाबतीत नक्कीच पुढे आहे पण आजही या देशात मुलगी जन्माला आली की तिला एकतर मारून तरी टाकले जाते किंवा तिला मरण्यासाठी वा-यावर सोडून तरी दिले जाते. अशा कितीतरी घटना आपल्या समोर असतील. पण समाज फक्त यावर हळहळ व्यक्त करतो ही परिस्थिती सुधारायला मात्र फार कमी लोक पुढे येतात. याचा चांगलाच अनुभव दोन मुलींना आला. त्यांच्या बिल्डिंग शेजारी कोणीतरी एक दिवसाच्या मुलीला मरण्यासाठी सोडून निघून गेले होते. या तरुणींनी या छोट्या मुलीला पाहिले आणि मदतीसाठी शेजा-यांना विनंती केली. पण मदत करणं तर दूरच राहिले लोकांनी आपले फोन बाहेर काढून या चिमुकलीचे फोटो कॅमेरात कैद करण्याइतकी खालची पातळी ओलांडली.

मैत्री मंजुनाथ, सुषमा सत्यानारायण या दोन्ही मुलीने एका मुलीचे प्राण वाचवून समाजात अजूनही माणूसकी जिवंत आहे हे दाखवून दिले. घरी परतत असताना मैत्रीला आपल्या बिल्डिंगखाली एक छोटं मुल रडताना दिसलं, तिने शेजार-यापाजा-यांना याची कल्पना दिली पण कोणीही तिला मदत केली नाही. शेवटी आपली मैत्रिण सुषमाला सोबत घेऊन तिने या मुलीला रुग्णालयात नेले. ‘या मुलीला आणायला थोडा उशीर झाला असता तर तिचा जीव गेला असता’ अशी डॉक्टरांची प्रतिक्रिया आली आणि या चिमुकल्या जीवाला वाचवण्याचे समाधान या दोन्ही मैत्रिणींच्या चेह-यावर उमटले. पण बंगलोर मिरर या वृत्तपत्रशी बोलताना त्यांनी एक खंत व्यक्त केली. या चिमुकलीला वाचवायचे सोडून लोकांनी तिचे फोटो काढण्याचा मुर्खपणा दाखवला याचे दु:ख या दोघांनी बोलून दाखवले.

या दोघांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या मुलीच्या आईलाही शोधून काढले आहे. शेजराच्या झोपडपट्टीत तिची आई राहते. या मुलीचे संगोपन करणे शक्य नसल्याचे कारण सांगत तिने आपल्या मुलीला रस्त्यावर मरणासाठी सोडून दिले होते.

गुजराती ट्रम्प कार्ड

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला आव्हान देण्यासाठी गुजराती ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. मंगळवारी दुपारी हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार घेऊन गुजराती समाजाला शिवसेनेसाठी साद घातलीय. तसंच न्याय हक्कांच्या लढ्यासाठी आपण शिवसेनेला पाठिशी उभं राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळंच शिवसेनेला हार्दिक पटेलला बोलवावं लागलं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाला लगावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *