सेनेच्या प्रचारासाठी गुजरातच्या हार्दिकची मुंबईत प्रचारसभा!

गुजराती पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी शिवसेनेच्या प्रचारासाठी मुंबईत सभा घेतली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुजराती समाजाची मतं शिवसेनेकडं वळवण्यासाठी शिवसेनेनं हार्दिक पटेल यांना मैदानात उतरवलंय. पटेल यांनी मंगळवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर गुजराती समाजाच्या मेळाव्यात भाषण केलं. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाईदेखील या मेळाव्याला उपस्थित होते.

सभा न होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न…

उद्धव ठाकरे गुजरातमध्ये आले तर आम्ही त्यांना सहकार्य करू, अशी ग्वाही पटेल यांनी यावेळी दिली. दरम्यान, मुंबईत आपली भाषणं होऊ नयेत, यासाठी सरकारनं अनेक कार्यक्रम रद्द केले, सभांना परवानगी नाकारली… रूम शिल्लक नाही, असं सांगून माझं सामानही बाहेर काढलं, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *