मुलायमसिंह आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात

समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकले आहेत.

सपा-काँग्रेस आघाडीला विरोध करणारे मुलायमसिंह आता या आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. उद्यापासून समाजवादी पार्टीचा प्रचार करणार असल्याचं मुलायम यांनी सांगितलंय. एवढच नव्हे तर अखिलेश यादवच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

काँग्रेससोबत आघाडीला विरोध होता. मात्र आता आघाडी झालीच आहे तर आपण दोन्ही पक्षांचा प्रचार करणार असल्याचं त्यानी नमूद केलं. अखिलेश यादव यांनी सपाची धुरा आपल्या हाती घेतल्यानंतर मुलायम यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले होते. तसेच विरोधात प्रचारही करणार असल्याचं सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *