अॅपलला मागे टाकून गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड बनला आहे. २०१७ मध्ये सर्वात लोकप्रिय आणि जास्त किंमत असलेला जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी ब्रॅंड म्हणून गुगल पुढे आला आहे. ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात हे सांगितले आहे. ब्रॅंड फायनान्सनुसार गुगलची किंमत १०९.४ अब्ज डॉलर (७,१९४ अब्ज कोटी रुपये) आहे. २०११ पासून अॅपल या स्थानावर होता. आता हे स्थान गुगलने मिळवले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने २४ टक्क्यांनी वाढ मिळवली आहे. मागील वर्षी गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू ८८.२ अब्ज डॉलर (५८०८ अब्ज डॉलर) होती. मागील वर्षी आयफोन ७ आणि ७ प्लस लाँच करुन देखील अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली. मागील वर्षी त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू १४५ अब्ज डॉलर होती यावर्षी ती १०७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत गुगलचा महसूल कमी झाला आहे. गुगलच्या जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या महसुलामध्ये २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. ब्रॅंड फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड यांनी म्हटले की अॅपलच्या काही उत्पादनांनी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे ही घसरण झाल्याचे ते म्हणाले. अॅपलच्या तुलनेत इतर कंपन्यांनीही तंत्रज्ञानात मुसंडी मारली याचा परिणाम देखील त्यांच्या ब्रॅंडवर झाल्याचे ते म्हणाले. अॅपलच्या काही उत्पदनांनी नफा कमवलाच नाही असे ते म्हणाले. अॅपल वॉच देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली नाही असे ते म्हणाले. गुगल पहिल्या स्थानावर आहे, दुसऱ्या स्थानावर अॅपल आहे, तिसऱ्या स्थानावर अॅमेजॉन आहे, चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी आहे, पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे.
