निवडणुकीसाठी मनसेकडून संदीप देशपांडेंच्या पत्नीला उमेदवारी

मुंबई महापालिका  निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय.

 या यादीत दादरच्या वॉर्ड क्रमांक १९१ मधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. वॉ़र्ड क्रमांक १९२ मधून स्नेहल जाधव यांना उमेदवारी जाहीर झालीय.

विद्यमान नगरसेवक सुधीर जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. वॉर्ड क्रमांक १९० मधून वीरेंद्र तांडेल यांच्या पत्नी भारती तांडेल यांना उमेदवारी जाहीर झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *