मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडच्या टाकी रोड अक्षरश: जलमय झाला आहे. त्यामुळं येथील नागरिकांनी कागदी होड्या सोडून महानगरपालिकेचा निषेध केलाय
घरा-घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरीक संतप्त झाले आहेत. मात्र कोणताही आतातायीपणा न करता येथील नागरिकांनी अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपला संताप व्यक्त करुन पालिकेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे.
दरवर्षी याठिकाणी पाणी साचतं. मात्र, कोणताच तोडगा निघत नाही. वेळोवळी मागणी करुनही पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

