अंतर्गत गटबाजीच्या कचाट्यात अडकलेल्या मुंबई काँग्रेसनं अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 115 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
पहिल्या यादीत काँग्रेसच्या विद्यमान 19 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप करत आतापर्यंत 8 नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांमध्ये कामत गटातील नगरसवेकांचा समावेश आहे. त्यामुळे निरुपम यांच्याकडून जाहीर होणाऱ्या यादीत कुणाकुणाची नावं असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.
