अखेर त्याला 27 व्या पत्नीच्या घरातून झाली अटक

प्रेम आणि लग्न आयुष्यात एकदाच होतं. पण आपल्या आसपास काही अपवादात्मक उदहारण असतात. ज्यांना आयुष्यात फक्त उपभोगाची सवय लागलेली असते. प्रेम आणि लग्न त्यांच्यासाठी कपडे बदलण्यासारखे असते. बांगलादेशात एक-दोन नव्हे तर, तब्बल 28 लग्ने करणा-या एका 45 वर्षीय लाखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केली आहे.
यासिन बायापारी असे या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याला 27 व्या पत्नीच्या घरातून अटक केली. 25 व्या पत्नीने यासिनने हुंडयासाठी आपला छळ चालवला असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यासिनची 25 वी पत्नी शिउली अख्तर तानियाने त्याच्या विरोधात तक्रार केली.
2011 मध्ये मी यासिनबरोबर लग्न केले. मुलीच्या जन्मानंतर मला  यासिनची मी 25 वी पत्नी असल्याचे समजले असे तानियाने सांगितले. मला हे समजल्यानंतर मी यासिनच्या 17 पूर्वपत्नींची नावे आणि पत्ते शोधून काढले असे तानियाने सांगितले. दुस-या पत्नीपासून यासिनला दोन मुली आणि तिस-या पत्नीपासून मुलगा आहे. सातव्या पत्नीपासून एक मुलगा आणि 24 व्या पत्नीपासून मुलगी असल्याची माहिती तिने दिली. लग्नानंतर कामाचे निमित्त करुन यासिन घरापासून लांब राहायचा असे तानियाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *