लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’जवळ बस पलटून एकाचा मृत्यू, १७ जखमी

लोणावळ्याजवळील प्रसिद्ध अॅम्बी व्हॅली येथील कामगारांना घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस शनिवारी सकाळी अपघातग्रस्त झाल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोणावळ्यापासून जवळच असलेल्या आयएनएस शिवाजी केंद्रांच्या मुख्य गेटजवळ ही बस पलटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

बस अॅम्बी व्हॅलीमधून निघाली, त्यावेळी बसमध्ये २० प्रवासी होते. सकाळी साडेसातच्या सुमारास बस लोणावळ्याच्या दिशेने येत असताना आयएनएस शिवाजीच्या प्रवेशद्वाराजवळच बस पलटी झाल्यामुळे अपघात झाला. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. बसमधील १७ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर लोणावळ्यातील परमार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *