हा कुत्रा आहे बेल्जियममधील आणि याचे वैशिष्ट्य हे आहे की, त्याचे शेपूट सर्वांत लांब शेपूट म्हणून नोंदविले गेले आहे.
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आल्याने साहजिकच या कुत्र्याचे महत्त्वही वाढले आहे. या कुत्र्याच्या शेपटाची लांबी आहे तीन फूट. कुत्र्याच्या लांब शेपटीचे यापूर्वीचे रेकॉर्ड याने मोडीत काढले आहे. या कुत्र्याच्या मालकाने याचे नाव ठेवले आहे ‘साहसी योद्धा.’ अगदी नावाला साजेसेच विक्रम हा कुत्रा करीत आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने या कुत्र्याबद्दल कुतूहल वाढले आहे. अगदी त्याच्या प्रमाणपत्रासह त्याचे फोटो एव्हाना सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.