खासगी समस्या फेसबूकवर शेअर करणा-या पत्नीची पतीने केली हत्या

पत्नी सतत मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याच्या तसेच मैत्रिणींना घरातील खासगी बाबी सांगत असल्याच्या कारणावरून पतीने तिचा खून केला. त्यांनतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. संगणक अभियंता असलेल्या या दाम्पत्याच्या कृत्याने खळबळ उडाली आहे. महिलेच्या बहिणीने घरी जाऊन पाहिल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
सोनाली गांगुर्डे (वय ३१, रा. शिवपार्क, मांजरी फार्म रोड, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.  तिचा पती राकेश गांगुर्डे याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही उच्च शिक्षित आहेत. पती खाजगी कंपनी मध्ये साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. दोघेही मुळचे नाशीकचे आहेत.  पत्नी गृहीणी आहे. तीन वर्षांपासून ते हडपसर येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली या बुधवार  दुपार पासून आईचा फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे आईने भावाला त्यांच्या घरी पाठविले. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांच्या मदतीने हा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा सोनाली रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडली होती. तर रॅकेशने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्येपूर्वी राकेशने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये ‘ माझी पत्नी फेसबुक, वाॅट्सअॅपवर मित्रमैत्रींन बरोबर वारंवार चॅटिंग करीत असते. आम्हाला मुल बाळं होत नाही, त्याच्या उपचारांची माहिती व घरगुती विषय बाहेरच्यांना शेअर करीते.यामुळे मी तीची हत्या करीत आहे. यामुळे कोणस दोषी धरू नये.’ असे लिहिले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *