१० हजारांची नाणी जमा करुन भरला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज

विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. नागपुरात एका उमेदवाराने तब्बल 10 हजार रूपयांची नाणी  घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. विलास बल्लमवार असं या शिक्षक उमेदवाराचं नाव आहे.

विलास बल्लमवार असं या शिक्षक उमेदवाराचं नाव आहे. विना अनुदानित शाळा कृती समिती या संघटनेच्या वतीने त्यांनी आपला अर्ज भरला. विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांची परिस्थिती दयनीय आहे.

गेल्या 16 वर्षांपासून पगार झालेला नाही. त्यामुळे बल्लमवार यांनी अनामत रक्कम ही त्यांनी अक्षरशः लोकांकडून एकेक रूपया जमवून भरली. बल्लमवार यांना यश मिळेल की नाही याबाबत माहिती नाही, पण त्यांन फॉर्म भरल्याने विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांच्या समस्या पुढे आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *