शौचास जाण्याच्या बहाण्याने कवठेमहांकाळमधून आरोपीचे पलायन

शौचास जाण्याच्या बहाण्याने कवठेमहांकाळमधून आरोपीचे पलायन

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये खून प्रकरणातील आरोपीने सोमवारी सकाळी शौचास जाण्याच्या बहाण्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. सचिन हाक्के असे आरोपीचे नाव आहे.
सख्या भावाच्या खून प्रकरणात पोलीसांनी सचिन हाक्के याला अटक केली होती. त्याला कवठेमहांकाळमधील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी शौचास जाण्यासाठी त्याला कोठडीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलीसांना गुंगारा देऊन तो पळून गेला. त्याला शोधण्यासाठी पोलीसांनी पथके रवाना केली आहेत. साधारणपणे आठवड्याभरापूर्वी सचिन हाक्के याच्या भावाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस तपासात त्यांनी सचिन हाक्के याला अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *