पालघरमध्ये घराला भीषण आग, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

पालघरमधील जव्हार शहरात भीषण आगीमुळे दोन घरे जळून खाक झाली. यामध्ये दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास जव्हार येथील तारपा चौकात घडली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जव्हार येथील तारपा चौकात कुरेशी यांचे घर आहे. रात्री अडीचच्या सुमारास अचानक घराला आग लागली. या वेळी घरातील सर्वजण झोपेत होते. त्यामुळे अनेकांना आग लागल्याचे समजले नाही. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. घरात सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. यामध्ये आयेशी कुरेशी व महरूम कुरेशी या दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीची घटना कळताच अग्निशमन दलाने त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. जखमींबाबत व नुकसान किती झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *