ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याला अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ओसामा बिन लादेननंतर हमजा याने अल कायदा या दहशतवादी संघटनेची सूत्रे सांभाळली आहेत.
अल कायदा संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याने दीड वर्षापूर्वी हमजा याला संघटनेचा प्रमुख म्हणून घोषित केले होते.
जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर अमेरिकेकडून हमजा याच्या संपत्तीवरही टाच आणण्यात येणार आहे.