दिल्ली मेट्रोत महिलांना चाकू बाळगण्यास परवानगी

विनयभंग, बलात्कार आणि छेडछाडीच्या सातत्याने घडणा-या घटनांमुळे महिलांसाठी असुरक्षित बनलेल्या नवी दिल्लीत महिला सुरक्षेसाठी मेट्रो रेल्वेमध्ये महिलांना स्वरक्षणासाठी आपल्यासोबत चाकू बाळगण्याची परवानगी दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन व सीआयएसएफने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमध्ये पाकिटमारांनी उच्छाद मांडला असून ९१ टक्के पाकिटमारीच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. महिलांना स्वत:चे रक्षण करण्यासाठी चाकू, लायटर आणि काडीपेटी सोबत ठेवण्याची परवानगीही मेट्रो रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना घातक शस्त्रे बाळगण्यास सीआयएसफची मनाई आहे. मात्र महिलांना त्यांच्या सुरक्षेसाठी चाकू बाळगण्याची परवानगी देण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. महिला व पुरूष पाकिटमारांकडून मेट्रो रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या कारवाया होत असल्याचे उघडकीस आल्याने हा निर्णय घेतल्याचे सीआयएसएफने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षात देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार ही २००१ मध्ये ५.४, २००९मध्ये ६.४ टक्के इतक्या घटनांची नोंद आहे. तर २०१४ मध्ये हीच आकडेवारी १,९४,८६७ इतकी आहे. यामध्ये महिला छेडछाड, हत्या आणि बलात्काराच्या घटनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *