यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीलाच लोणावळ्याचा भुशी डॅम भरून वाहू लागलाय. मान्सून पिकनिकसाठी पर्यटकांची अत्यंत आवडती जागा म्हणून भुशी डॅमचा लौकिक आहे.
कालपासून लोणावळ्यात जवळपास १६० मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुळं मुसळधार पावसानं लोणावळा परिसरातले ओढे, धबधबे भरभरून वाहू लागले आहेत. त्यामुळं भुशी धरण नेहमीपेक्षा वीस दिवस आधीच भरल्यानं आतच पर्यटकांना चांगली पर्वणी लाभली.

