भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) गावात एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे दिसत आहे. भिलवडी गावातील मुख्य रस्त्यावर आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास ग्रामस्थांना मृतदेह दिसून आला. ग्रामस्थांनी त्वरीत पोलिसांना पाचारण केले. पोलीस तपास करत आहेत.
भिलवडी गावातील मुख्य रस्त्यावरून गावातील मुले शाळेला जातात. सकाळी वर्दळ सुरू झाल्यानंतर काही ग्रामस्थांना शाळकरी मुलीचा मृतदेह आढळला. या मुलीवर शारीरिक अत्याचार झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अद्याप वैद्यकीय अहवाल आलेला नाही. वैद्यकीय अहवालानंतरच सर्व स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. शाळकरी मुलीचा मृतदेह आढळून आल्याने पालकांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.