महिलेनं कुऱ्हाडीनं केली पतीची हत्या, पत्नी फरार

महिलेनं कुऱ्हाडीनं केली पतीची हत्या, पत्नी फरार

उत्तर प्रदेशच्या कनौज जनपद इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेनं आपल्या पतीनं कुऱ्हाडीनं हत्या केलीय. सध्या महिला फरार असून पोलीस तिचा तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठठिया इथल्या भुलभुलयापूर गावात राहणाऱ्या ३० वर्षीय किसान प्रवीण कुमार पत्नी उमा देवी सोबत राहत होता. शुक्रवारी रात्री पती-पत्नीदरम्यान कोणत्यातरी कारणामुळं वाद झाला. पाहता-पाहता वाद इतका वाढला की, उमानं कुऱ्हाडीनं प्रवीणवर वार करून त्याची हत्या केली आणि ती फरार झाली.

शनिवारी सकाळी गावकऱ्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रवीणचा मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह पोस्टमार्टेमला पाठविण्यात आलं. याप्रकरणी पत्नी उमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *