गोरेगाव येथील हब मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग

मुंबईतील गोरेगावमधील हब मॉलमध्ये आग लागली आहे. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे  म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या व ४ पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले असून अजून आग नियंत्रणात आलेली नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

गोरेगाव येथे तीन मजली हब मॉल आहे. याच्या दुसऱ्या मजल्यावरील गोल्डन शेरियट रेस्तराँमध्ये ही आग लागली. आग लागल्यानंतर मॉलमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *