जुन्या नोटा बाळगल्यास दंडात्मक कारवाई, वटहुकूम जारी

चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेल्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या नोटांसंदर्भातील वटहुकूम जारी करण्यात आला आहे. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय केबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचा भंग केल्यास किमान 50 हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या नोटा बाळगणं आता चांगलेच महाग पडणार आहे.
चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंतची आहे. ही मुदत संपत आली असून यानंतरही जर कुणी जुन्या नोटा बाळगताना आढळलं तर त्या व्यक्तीला जुन्या नोटांच्या अध्यादेशानुसार दंड होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *