कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात रविवारी रात्री ९०० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. चिंतामणी गावात ही घटना घडली. या स्फोटात तीन वाहने जळून खाक झाली.
दरम्यान, या दुर्घेटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला आगीच्या घटनेची माहिती मिळताच ४-५ अग्शिमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेय.
सुरुवातीला ट्रकमध्ये आग लागली. त्यानंतर इतर वाहनांनाही आग लागली. गॅससिलिंडरच्या स्फोटांमुळे संपूर्ण गावातही गॅसचा वास पसरलाय.