…म्हणून तैमुर ‘खानदानी’ संपत्तीचा वारस बनू शकणार नाही

तैमुरच्या जन्मानंतर करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. खान कुटुंबातील हा छोटा नवाब गडगंज संपत्तीचा युवराज झाल्याचे प्रत्येकालाच वाटत असेल. पण हा छोटा नवाब सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारस बनू शकणार नाही.
करिना कपूरने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात चिमुरड्याला जन्म दिला. करिनाला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आणि ती लहानग्या तैमुरसोबत घरीही आली. पण खान कुटुंबात जन्म घेतला असला तरी या छोट्या नवाबला ५ हजार कोटींचा मालक होता येणार नाही. सैफचे पणजोबा हमीदुल्ला खान जे भोपाळचे शेवटचे नवाब होते. त्यांची संपूर्ण चल आणि अचल संपत्ती ही एनीमी प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत येते. संपत्तीचे मालक दुसऱ्या महायुद्धानंतर पाकिस्तान किंवा चीनमध्ये गेले होते अशा व्यक्तींसाठी एनिमी अॅक्ट लागू होतो.भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांनी आपल्या संपतीचे वारस त्यांची मोठी मुलगी आबिदा हिला बनवले होते. त्या नंतर पाकिस्तानला गेल्या होत्या.

एनिमी प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत सरकार नेहमीच नवनवीन अध्यादेश लागू करत असते. ज्यामुळे पाकिस्तानला गेलेल्या संपत्ती मालकांच्या खटल्यांचा निर्णय देण्यात येईल. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने याच गुरुवारी पाचवा अध्यादेश लागू करण्याची संमती दिली. मंत्रिमंडळाने संमती दिल्यानंतर आता हा अध्यादेश अंतीम संमतीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. पण नोटाबंदीच्या मुद्यामुळे या बिलावर आतापर्यंत शिक्कामोर्तब झाले नव्हते.

कायद्यामुळेच संपत्तीपासून दूर राहू शकतात
सैफ आणि तैमुर या कायद्याच्या पेचांमुळेच सैफ आणि त्याच्या मुलाला हमीदुल्ला खान यांच्या संपत्तीचा कोणताही फायदा मिळणार नाही. त्यात पतौडी खानदानाची संपत्ती सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनत आली आहे. केंद्र सरकारने आबिदा यांच्या संपत्तीचा हिशोबही मध्यप्रदेश सरकारकडून मागितला आहे. भोपाळमध्ये सैफच्या पणजोबांची संपत्ती एकूण ५००० कोटी रुपये एवढी आहे. तर हरियाणा आणि देशाच्या इतर भागातही त्यांची कोटींची संपत्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *