दिल्ली रेल्वे स्टेशनवर 31 लाखाची रोकड जप्त

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील विविध भागातून काळा पैसा बाहेर येऊ लागला आहे. विविध ठिकाणाहून नोटा जप्त करण्याचा सिलसिला सुरुच आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर तब्बल 31 लाखाची  रोकड जप्त  करण्यात आली आहे.

यात पाचशे आणि हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या चांदौसी इथं तब्बल 21 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. यातील सोळा लाख रुपये 2 हजारच्या नोटांच्या स्वरुपात आहेत. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *