राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा जुलै ते ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
२१ जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर ऐवजी यंदा जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीत महत्वाचे असलेले शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
आठ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यंदा लवकर दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील असे जाहीर केले होते.
दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोंबर दरम्यान दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्याच्या परीक्षा होतात. परीक्षेचे दिनांकनिहाय स्विस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

