शिरपूरमध्ये सेंट्रल बँकेत भरदिवसा चोरी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात दिवसाढवळ्या चोरांनी सेंट्रल बँकेच्या शाखेत जबरी चोरी  केली आहे.

दोघा चोरटयांनी शस्त्रांचा धाक दाखवत तब्बल दहा लाखापेक्षा अधिकची रक्कम लंपास केली आहे. बँक बंद करण्याच्या सुमारास हे दोघे चोरटे बँकेत घुसले, एकाने बंदुकीचा धाक दाखवला.

तर दुसरा चोरटा कॅश काउंटरजवळ गेला आणि त्यांनी होती ती सर्व रोकड पिशवीत टाकली, आणि दोघे चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी  दाखल झाले.

दिवसाढवळ्या चोरांनी लूट केल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *