माजी महाराष्ट्र केसरी पैलवान खुनाच्या गुन्ह्यात अटक

येथील माजी महाराष्ट्र केसरी पैलवानदत्तात्रय गायकवाड यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वडकीतील शिवाजी गायकवाड यांच्या खुन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

शिवाजी गायकवाड हे सोमवारी सकाळी ७ च्या दरम्यान कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्य झाला. याप्रकरणी शिवाजी गायकवाड यांचा मुलगा अजिंक्य गायकवाड याने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार ८ आरोपींना अटक करण्यात आलीय.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड यांचा समावेश आहे. दत्तात्रय गायकवाड हे २००३ चे महाराष्ट्र केसरी आहेत. जमिनिच्या वादातून हा खून झाल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *