गोरेगावातील एका उच्चभ्रू इमारतीत १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी बलात्कार आणि पॉस्कोच्या गुन्ह्यात एका ३५ वर्षांच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
एकाच इमारतीत पीडित मुलगी आणि आरोपी राहतो. रविवारी दुपारी पावणेदोन ते अडीचच्या सुमारास एका मैत्रिणीला भेटून ही मुलगी घरी जाण्यासाठी लिफ्टची वाट पाहत उभी होती. तेव्हा या इसमाने तिला पाहिले आणि पायऱ्यांवरून तिला इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, त्या वेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरक्षारक्षकाने धाव घेत, मुलीची सुटका केली.
