करीना-सैफच्या घरी ‘बेबी बॉय’चे आगमन

करीना-सैफच्या घरी ‘बेबी बॉय’चे आगमन

बॉलिवूडची ‘बेबो’ करीना आणि ‘नवाब’ सैफ अली खान यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारा ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने बाळाला जन्म दिला असून आई व बाळ दोघांचीही तब्येत उत्तम असल्याच समजते. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कपूर आणि पतौडी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यांपूर्वी स्वत: सैफनेच आपण ‘बाबा’ बनणार असल्याची गुड न्यूज शेअर केली होती. डिसेंबर महिन्यात आम्हाला बाळ होणार असल्याचे त्याने नमूद केले. तसेच चाहत्यांच्या आशिर्वादासाठी आभार मानत, मीडियाने खासगी आयुष्यात छवळाढवळ न करता पेशन्स दाखवल्याबद्दलही आम्ही आभारी आहोत असेही सैफने म्हटले आहे होते.
करीनाच्या प्रेग्नन्सीची चर्चा ब-याच काळापासून सुरू होती. करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील मला लवकरच आजोबा बनायचं आहे असे विधान केले होते. या सगळ्यामुळे करिना-सैफच्या घरात लवकरच पाळणा हलणार असणार असल्याचे म्हटले जात होते.  त्यानंतर सैफनेच ही खूशखबर दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *