मुंबईमधील नरीमन पॉईंट येथील एअर इंडियाच्या इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर आग लागली होती. सुमारे साडेसहाच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आले. अग्निशमन दलाने त्वरीत धाव घेतल्याने मोठे नुकसान झाले नाही. साडेआठच्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग कशामुळे लागली, त्यावेळी कार्यालयात कुणी उपस्थित होते का, याबाबत समजू शकलेले नाही.
मरीन ड्राइव्ह येथे एअर इंडियाची ही २३ मजली इमारत आहे. २०१३ पर्यंत या इमारतीत एअर इंडियाचे मुख्यालय होते. आता दिल्लीत कार्यालय हलवण्यात आले आहे. २१, २२ व २३ व्या मजल्यावरून एअर इंडियाचे मुंबईतील कामकाज चालते.
