सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग

येथील वसंतविहार भागातील एका सुनेचा तिच्याच सासऱ्याने विनयभंग केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली. त्याने धमकी दिल्याने, तिने याबाबतची तक्रार नोंदवली नव्हती. अखेर, महिनाभरानंतर तिने या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुनेचे आणि सासू-सासऱ्यांचे पटत नसल्यामुळे त्यांनी मुलासह सुनेलाही घराबाहेर काढले होते. सासऱ्याने तिला घरात न घेतल्याने तिने घरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आपला त्यांनी विनयभंग केला, अशी तक्रार तिने दिली. त्याच वेळी त्यांनी आपल्याला घराबाहेर ढकलून दिल्याचेही तिने या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी सासरा ८० वर्षीय असून, या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *