पुणेकरांची ‘डोकॅलिटी’, रुमालावर छापली लग्नाची निमंत्रणपत्रिका

 पुणेकरांची ‘डोकॅलिटी’, रुमालावर छापली लग्नाची निमंत्रणपत्रिका

पुणे तिथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते. याचा अनुभव आता एका लग्नपत्रिकेवरुनही आला आहे. सोशल मीडियावर रुमालावर छापलेली लग्नाची निमंत्रणपत्रिका व्हायरल होत असून ही पत्रिका आकर्षणाचा विषय ठरली आहे.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट. लग्नातील कपडे, दागिन्यापासून ते अगदी लग्नमांडवातील सजावट आकर्षक  असावी यासाठी प्रत्येकजण नवनवीन शक्कल लढवत असतो. लग्नाची निमंत्रणपत्रिकाही हटके असावी यावरही भर असतोच. आकर्षक डिझाईनपासून त्यामधील मजकूरही कसा लक्षवेधी असेल याकडेही अनेकांचा कल असतो.  यात पुणेकर कसे मागे राहतील. पण लग्नपत्रिकेत कागदाचा वापर होतो आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार हे निश्चित. या समस्येवर पुणेकर दाम्पत्याने भन्नाट तोडगा काढला आहे. सोशल मीडियावर पुण्यातील एक निमंत्रणपत्रिका व्हायरल झाली आहे. रुमालावर छापलेली ही लग्नपत्रिका सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. रुमाल दोन – तीन वेळा धुतला की रुमाल स्वच्छ होईल आणि तो वापरता येईल. याशिवाय पर्यावरणाची हानीदेखील होणार नाही. आता ज्यांनी ही पत्रिका छापली त्यांचा नेमका उद्देश काय असला हे माहित नाही. पण त्यांच्या या हटके डोकॅलिटीचे कौतुक करावे तितके कमीच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *