मुंबईच्या झवेरी बाजारातील सोन्या-चांदीच्या चार कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) छापे टाकलेत.
नोटाबंदी जाहीर केल्यानंतर या कंपन्यांकडून 69 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आले. या कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा कऱण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे या संशयित व्यवहाराप्रकरणी हे छापे टाकण्यात आलेत.