मुंबईत पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिका जबाबदार नाही : उद्धव ठाकरे

मुंबईत पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिका जबाबदार नाही : उद्धव ठाकरे

पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस पडला आहे. अजूनही मोठा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पावसात पाणी साचण्याला महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीची माहिती घेतली. मुंबईसाठी एकच पालक यंत्रणा हवी, असे माझे मत आहे. मी एमएमआरडीएला दोष देणार नाही. पण अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एकच पालक यंत्रणा असली पाहिजे, असेही उद्धव यावेळी म्हणाले.

मिठी नदीच्या परिसरात राहणाऱया लोकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय, मुंबईत पाऊस कोसळत असताना वर्धापन दिन साजरा करणे योग्य नाही, त्यामुळेच आजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *