वाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त

एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत.

राज्यातील वाशिममधूनही रोकड जप्त केल्याची घटना समोर आलीये. वाशिममधील करंजा येथून 2000 आणि 100च्या नोटा असलेल्या तब्बल 41 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केलीये. तसेच या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलेय.

नव्या 2000च्या नोटा चलनात आणल्यानंतर देशात अनेक ठिकाणी या नोटांचे घबाड सापडल्याच्या घटना समोर येतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *