छगन भुजबळांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्ज फेटाळला

मागील काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला. भुजबळांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटक झाली आहे.
पीएमएलए कायद्यातंर्गत बेकायदेशीर अटक केल्याचा भुजबळांचा दावा होता तसेच प्रकृती बरी नसल्याने जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती. पण उच्च न्यायालयाने भुजबळाचा अर्ज फेटाळून लावला. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेली याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
कोर्टाच्या आदेशाचा गैरवापर करुन भुजबळ रुग्णालयात होते. त्यामुळे याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी हा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *