शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला !

शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मोदी हे २४ डिसेंबरला विविध कार्यक्रमांसाठी मुंबईत येत असून, तेव्हाच स्मारकाचे भूमिपूजन त्यांनी करावे, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने त्यांना करण्यात आली आहे.

२४ तारखेला मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन टप्प्यांचे भूमिपूजन, कलिना आणि वांद्रे जंक्शन येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे. शिवडी-नावाशेवा ट्रान्सहार्बर लिंकचे भूमिपूजनही मोदी करणार

आहेत. वेळ आणि सुरक्षेच्या कारणावरून प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नसल्याने, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एकत्रित कार्यक्रम होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी समुद्रातील प्रत्यक्ष स्मारकस्थळी पंतप्रधान व अन्य मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *