आपल्या बोल्ड अदा आणि मादक अवताराने सर्वांवर भुरळ पाडणा-या आणि नेहमी चर्चेत असणा-या अभिनेत्री सनी लिओनीचा एक वेगळाच अंदाज नुकताच पहायला मिळाला. सनी आणि तिचा पती दोघेही चक्क भारतीय पेहेरावांमध्ये दिसत होते.. याचं निमित्त होतं सनीच्या भावाचे, संदीपचे लग्न..
सनीचा लहान भाऊ संदीप आणि करिश्मा या दोघांचे लग्न नुकतेच, पारंपारिक पद्धतीने गुरुद्वारामध्ये पार पडला. आपल्या छोट्या भावाच्या लग्नानिमित्त खूप खुश असलेल्या सनीने लग्नासाठी त्याची तयारीही करून दिली. गर्द निळ्या रंगाच्या पारंपरिक सलवार कमीजमध्ये सनीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तर शेरवानीमध्ये तिचा नवराही रुबाबदार दिसत होता.
