मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उगवे येथे रस्ता अपघातात सातारा येथील ओंकार कुलकर्णी (३०) या युवकाचे जागीच निधन झाले.
पेडणे पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील ओंकार कुलकर्णी हा युवक एमएच-५०-जी-८९८५ या पल्सर मोटरसायकलवरून गोव्यात पणजीला येत असताना त्याच्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येणा-या जीए-०३-एक्स-००९६ या कदंब वाहतूक मंडळाच्या प्रवाशी बसला बसली आणि ओंकार रस्त्यावर जोराने आपटला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते.
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचा चालक जुझे लोबो याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पेडणे पोलीस करत आहेत.

