अस्सल ‘मेकओव्हर क्वीन’ सदाबहार अभिनेत्री रेखा सुद्धा बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचा शिकार झाल्या आहेत. याचा खुलासा त्यांच्या पुस्तकामार्फत झाला आहे. रेखा यांच्या आयुषावर अधारित असलेलं रेखा अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक नुकतेचं प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. हा प्रकार रेखा यांनी चित्रपट करण्यास सुरवात केली होती त्यावेळचा आहे.
या पुस्तकात रेखाच्या जीवनातील त्या क्षणांबद्दल बोलण्यात आलं आहे. आणि आतापर्यंत याच्याबद्दल कुठेच वाच्यता केली नव्हती. त्यावेळी रेखाचं वय 15 वर्ष होतं. त्यावेळी त्यांच्या इच्छेविरुद्ध पाच मिनिटापर्यंत किसिंग सिन चित्रित केला होता. शुटपूर्वी रेखाला याची फुसटची कल्पनादेखिल नव्हती.
70 च्या दशकातला काळ असा होता की, ओठांवर चुंबन घेणं हे टॅबू समजलं जात असे. प्रेमी जोडपी गाणी गाऊन आपला रोमासं व्यक्त करत. आणि जर इंटिमेट सिन असेल तर दोन फुलांना एकत्र दाखवायचे. मात्र या सिनेमात अगदी जबरदस्तीचा बोल्ड सिन टाकण्यात आला.
1969 मध्ये रेखा मेहबूब स्टुडिओमध्ये अंजाना सफर या चित्रपटाचे शुटिंग करत होत्या. यामध्ये मुख्य अभिनेता बिस्वजित होते. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केलं होतं. राजा आणि विश्वजीतने प्लान केला आणि त्यांच्या निशाणावर होती रेखा. त्या दिवशी रेखा आणि विश्वजीतवर एक किसिंग सिन शूट करण्यात येणार होता. शूटच्या अगोदरच सर्व प्लान तयार होता.
ज्याक्षणी दिग्दर्शक अॅक्शन म्हटलं त्यावेळी विश्वजीतने रेखाला आपल्या मिठीत घेतलं. आणि आपले ओठ रेखाच्या ओठांवर टेकवले. रेखा त्याक्षणी स्तब्ध होती. या किस संदर्भात रेखाला अगोदर कुणीच काही सांगितल नव्हतं. कॅमेरा चालत होता. आणि त्याक्षणी दिग्दर्शकाने देखील कट सांगितलं आणि विश्वजीतने देखील रेखाला सोडलं नाही. जवळ जवळ ५ मिनिटे विश्वजितने रेखाला आपल्या मिठीत ठेवलं होतं.
