पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीनंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना मंगळवारी सूज आणि त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं विशेष पथक दिलीप कुमार यांच्यावर लक्ष ठेवून असून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. विशेष म्हणजे 11 डिसेंबर रोजी दिलीप कुमार 94 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
‘दिलीप कुमार यांना नेहमीप्रमाणे नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात न्यायचं होतं. मात्र त्याआधीच त्यांना पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाढदिवसाआधी आपण त्यांना घरी नेऊ’, असं दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी सांगितलं आहे.