ललित मोदींच्या मदतीमुळं वसुंधरा राजेंची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची धोक्यात

ललित मोदींच्या मदतीमुळं वसुंधरा राजेंची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची धोक्यात

ललित मोदींसोबतच्या संबंधामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. कारण भारतीय जनता पक्षाने वसुंधरा राजेंची पाठराखण करण्यापासून हात आखडता घेतला असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय त्यांच्यावर राजीनाम्याचाही दबाव वाढला आहे.

या सगळ्यात भाजपचे उपाध्यक्ष ओम माथूर यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. या वादाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची बुधवारी भेट घेतली आणि स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यांच्या उत्तरानं केंद्रीय नेतृत्व समाधानी नाही.

केंद्रीय नेतृत्वाकडून वाढत असलेल्या दबावादरम्यान, राजस्थान सरकारमधील मंत्री राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजेंची पाठराखण केली आहे. मात्र, संघ आणि पक्षाची नाराजी असल्यानं वसुंधरा राजेंच्या खुर्चीवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *