अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील ऑकलंड येथे नाइट क्लबमध्ये पार्टी सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलीसांनी दिली आहे. मात्र, ही आग एवढी भीषण होती की, यात 40 पेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांचे वृत्त आहे.
जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अनेक जण या आगीत गंभीररीत्या भाजले आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 11.30च्या दरम्यान ही आग लागली आहे. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी नाइट क्लबमध्ये गोल्डन डोना ग्रुपचं कन्सर्ट सुरू होतं. त्यामुळे लोकांनी ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपासच्या न्यूटन, वाल्थम, वेकफिल्ड आदी ठिकाणांवरून अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले असून, अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ऑकलंडमध्ये आग लागलेल्या नाइट क्लबजवळील गोडाऊनमध्ये
तीन आठवड्यांपूर्वीपासून काही लोक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती ऑकलंड नियोजन विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे