पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल यांचा आज ४६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ट्विटवरून शुभेच्छा देऊन सगळ्यांनाच धक्का दिला. ‘काँग्रेस उपाध्यक्ष श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा मी व्यक्त करतो’, असं मोदींनी ट्विट केलं आहे.
मोदींकडून राहुलना वाढदिवसाच्या शुभेच्छा

