एमबीए, इंजिनिअर तिहार तुरुंगात करतायत गार्डची नोकरी

देशातील उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या ज्ञानाच्या तुलनेत मोठया पगाराच्या नोक-या मिळत नाहीत हे आजचे वास्तव आहे. त्यामुळेच तिहार तुरुंगात उच्चाशिक्षित पदवीधर तरुणांना आज तुरंगरक्षक, वॉडर्स सारख्या पदांवर नोकरी करावी लागत आहे. देशातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या तिहार तुरुंगात यावर्षी ५९ तरुण-तरुणी नोकरीसाठी रुजू झाले.
त्यातील पाच इंजिनिअर, चार एमबीए तर अन्य विज्ञान, वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. तुरुंगरक्षक, वॉडर्स ही छोटी पदे असून त्यासाठी १२ वी उर्तीण एवढीच शैक्षणिक पात्रता लागते. तिहार तुरुंगातील ही नोकरभरती सध्याचे वास्तव चित्र दाखवणारी आहे.
तुरुंग रक्षक आणि वॉडर्स म्हणून नोकरी स्वीकारणा-या या तरुण-तरुणींना ५२०० ते २०२०० रुपयापर्यंत वेतन मिळेल. ही दिल्ली सरकारमधील ड्रायव्हर, ज्युनियर कारकूनाशी मिळती-जुळती वेतनश्रेणी आहे. तिहार तुरुंगातील पदासाठी एकूण ४५ हजार अर्ज आले होते.
या उच्चशिक्षित तरुणाईचा तुरुंग व्यवस्थापन सुधारण्यासाठी वापर करुन घेण्याचा निर्णय तुरुंग अधिका-यांनी घेतला आहे. तुरुंगातील कैद्यांना शिकवणे, तुरुंगातील फॅक्टरी व्यवस्थापन अशी कामे या उच्चशिक्षित मंडळींकडे दिली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *