नाशिक – त्र्यंबक रस्त्यावर गुरूवारी सकाळी भरधाव वेगाने जाणारी कार उलटून चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यामध्ये कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
भरधाव वेगात असलेली एम.एच १५ ईबी ५२३० ही व्होल्सवॅगन व्हेंटो कार नाशिक – त्र्यंबक रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ उलटली. कारचाकाच ताबा सुटल्याने हा अपघात झाला. जखमी चालकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
