दिल्ली हायकोर्टाने ३४४ कॉम्बिनेशन औषंधावरील बंदी उठवली आहे. मार्च महिन्यात एक गॅझेट नोटिफिकेशनद्वारे ३४४ कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला होता. त्या औषधांमध्ये काही कफ सिरप, वेदनाशमक गोळ्या आणि अॅन्टीबायॉटिक औषधांचाही समावेश होता. या निर्णयाची तत्काळ अमलबजावणी करत या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.
मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात औषध क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडून सुमारे ४५० याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरूवारी उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द करत या औषधांवरील बंदी उठवली.

