खडवली रेल्वे स्थानकात दीड महिन्याच्या मुलीला सोडून दाम्पत्य पसार झाले. कसारा लोकलमधून सॅक घेऊन आलेल्या व्यक्तीने या मुलीला फलाटावर सोडले आणि तो टिटवाळ््याला गेला. तेथे ब्रिजवर त्याला महिला भेटली आणि दोघे मंदिराच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.
मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांनी तिला स्टेशन मास्तरांच्या ताब्यात दिले. त्यांनी तिला जीआरपी कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यांनी मुलीला डोंबिवलीच्या बालसुधारगृहात भरती केले आहे. रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
