ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पक्षाघाताचा झटका आल्याने ICU मध्ये उपचार सुरु आहेत. रंगमंचावर भैरवी सादर करताना त्या खाली कोसळल्यात.

लावण्य संगीत हा विशेष कार्यक्रम यंशवंत नाट्यमंदीरात पार पडला. यावेळी तब्बल बारा वर्षांनी अभिनेत्री मधू कांबीकर परफॉर्म करत होत्या. काही वेळ नृत्य सादर केल्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवली. मात्र, भैरवी आपणच करणार या त्यांच्या आग्रहाला शरीरानं साथ दिली नाही. आणि त्या स्टेजवरच कोसळल्या. त्यांना तात्काळ मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *