कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर

कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर

ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा ठार झाला आहे. या कारवाईत त्याचा एक साथीदार धनंजय शिंदे देखील ठार झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो फरार होता.

सोमवारी रात्री चाकण येथे वरसाई पवनचक्कीच्या डोंगरात दाभाडे आपल्या साथीदारासह लपून बसल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी परिसरात वेढा घालून दाभाडे याला शरण येण्यास सांगितले. यावेळी दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. पोलिसांना त्यांच्याकडे चार पिस्टल, एक कट्टा आणि 42 राउंड मिळून आले आहेत. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *